नात्याचं ऑडिट

  • 8.6k
  • 1
  • 2.3k

नात्यांचं ऑडीट जरूरत के हिसाब से जब, हर कोई बिकने लगा। वक्त के साथ रिश्तों का, हिसाब रखना जरुरी सा लगा। लॉकडाऊन च्या काळात एका संध्याकाळी माझी मैत्रीण, नम्रता, तिचा मला फोन आला, आम्ही बालवाडी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत सोबत असल्याने मैत्रीण कमी बहीण जास्त आहे ती माझी, आणि नशीब असं आमचं की लग्न करून एकाच शहरात राहण्याच सौभाग्य लाभलं आम्हाला....तर तिचा फोन आला मला, फोन रिसिव्ह करताच तिच्या बोलण्यातून जाणवलं की ती काहीतरी अडचणीत असावी किंवा कुठल्या तरी टेन्शन मध्ये असावी...ज्या व्यक्तींशी आपण रोज बोलतो, ज्यांना खूप जवळून ओळखतो त्यांच्या आवाजावरून कळून येत की त्यांची परिस्थिती कशी आहे...तिच्या आवाजातून