श्वास असेपर्यंत - भाग २

  • 8.7k
  • 5.1k

मी अमर , माझा जन्म अगदी स्वातंत्र चळवळीच्या नंतरचा असावा. एक छोटंसं आमचं गावं. खूप काही लोकसंख्या नसणार तरी चार- पाचशे लोकं त्या गावात राहत असत. सर्वच धर्माची लोकं तिथे राहत असायचे. त्यात एक आमचं छोटंसं कुटुंब.आईच्या पोटी तशी चार - पाच जन्माला आली पण काही जन्मताच मेली तर काही एक वर्ष असताना दगावली. तो काळच तसा होता. वेळेवर औषध नाही किव्हा मग दवाखाना नसल्याने,साथीचे रोग,महामारी असल्याने जास्त मुले वाचत नसायची,त्यात मी आणि बहिण चित्रा