(मुग्धाबद्दल एव्हाना सिलूने जॉर्ज आणि मीराला सांगितले होते. ती दोघे मुग्धाला अमेरिकेत येण्याचा नेहमी सल्ला देत असत. त्यांचे ऐकून मुग्धाला ही क्षणभर वाटे की, सगळं सोडून सरळ सिलूकडे अमेरिकेला निघून जावे. पण सध्यातरी ते तिला शक्य नव्हते. आता पुढे..) मुग्धा सुद्धा तिच्या ऑफिसच्या कामात व्यग्र असे. जर तिला सिलूची खूपच आठवण झाली तर कॉफी शॉप किंवा चौपाटी ही तिची ठरलेली एकांतात बसायची ठिकाणे असत. कधी कधी उमा ही तिला कंपनी द्यायला तिच्याबरोबर येत असे. असेच सहा महीने निघून गेले. सिलू आणि मुग्धा यांनी एव्हाना एकमेकांना कामात बरेचसे व्यस्त करून घेतले होते. त्यामुळे फक्त एकमेकांशी बोलण्याइतपत ते वेळ काढत असत. सिलूच्या