दिवाना दिल खो गया (भाग ६)

  • 7.9k
  • 3.1k

(मुग्धाने पुन्हा ‘हॅपी जर्नी’ असा मेसेज सिलूला सेंड केला. त्यावर सिलूने रिप्लाय केला की, “प्लीज स्वत:ची काळजी घे. मी तुला मॉर्निंगला कॉल करेन. आता तू शांत झोप. मी तुझ्याजवळच आहे मुग्धा आणि नेहमी राहीन”. तो मेसेज वाचताच मुग्धाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती मंद हसली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. आता पुढे..) आज मुग्धाला ऑफिसला जायचा बिलकुल मूड नव्हता. तिला आज एकांत हवा होता आणि तो घरात मिळणे तर बिलकुल शक्य नव्हते म्हणून ती ऑफिसला जाते असे सांगून घरातून ती दुपारी जेवून निघाली. ती थेट कॉफी शॉपवर पोहोचली. तिथे कॉफी पित २-३ तास सहज निघून जाणार होते. कॉफी शॉपमध्ये आल्यावर