भीष्म संक्षिप्त गाथा.

  • 24.2k
  • 9k

'भीष्म!' पुर्वीचे देवव्रत आणि नंतरचे पितामह भीष्म हे महाभारतातील पात्र माझं सर्वाधिक आवडतं पात्र आहे. भीष्मांच्या भोवती इच्छामरणाच एक रहस्यमयी वलय आहे; पण या वलयांकित भीष्मांपेक्षा मानवी जीवनात जगण्याची मूल्ये पेरणारे भीष्म मला अधिक आवडतात. काळाच्या ओघात पुराणात झालेली अतिशयोक्तीची व चमत्कारी प्रतापांची घुसळण, जमेल तितकी, दुर सारून मी पितामह भीष्म या पात्राचा (माझ्या बौद्धिक कुवतीनुसार) आढावा घेतो. • जन्म : राजा शांतनू (पुर्वजन्मीचा महाभिष) देवसभेत बसले असता तिथे माता गंगा आली होती. सौंदर्यवती गंगेच्या मोहला राजा शांतनू बळी पडले आणि देवाकडून या दोघांनाही पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला. या शापामागे एक वरदान लपलेलं होतं.