पडछाया - भाग - ६ - अंतिम भाग

  • 6.6k
  • 1
  • 2.9k

रविवारची सकाळ.. आई तयार झाली.. तिने डब्यात शिरा करुन घेतला.. थर्मासमध्ये कॉफी बनवून घेतली.. बैठकीत येऊन घड्याळ पाहिले.. सकाळचे दहा वाजून गेले होते.. इतक्यात मोबाईल वाजला..." अभिनंदन आई.. तू आजी झाली आहेस.. मुलगी झालीये.. दोघीही सुखरुप आहेत.. " पलीकडून विहान बोलतं होता." छान झालं.. मी निघतेच आहे.. येताना काही आणायचं असलं तर सांग?.. " आई आनंदात म्हणाली." काही नको.. तू ये लवकर.. तुझ्या नातीने आजीचा धोसरा लावला आहे.. " विहान म्हणाला.आईने कॉल कट केला.. आत जावून हॉटपॉट मध्ये शिरा भरला.. आणि तो घेऊन ती बाहेर आली, दाराला कुलूप लावले अन बाहेर पडली.. टॅक्सी