श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 4

  • 9.3k
  • 5.2k

विठ्ठल लोकदेव देव आहे. तो लोकांचा देव आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरचा पंढरपूर आहे. त्या कारणाने कर्नाटक मधली भक्त मंडळी सुद्धा पंढरपूरला येतात. त्यामुळेच म्हटले जाते कानडा विठ्ठल माझा. पुंडलिक मातृ-पितृ भक्त असण्याच्या आधी भक्त पुंडलिक स्वतःच्या पत्नीची सेवा करायचा. तिला त्रास होईल असे काही करायचा नाही. तो आई-वडिलांना रागवायचा. माझ्या पत्नीला काही कामे सांगायचे नाहीत. तिला आरामात ठेवायचे. असा दम तो स्वतःच्या आईवडिलांना द्यायचा... पंढरपूरच्या यात्रेला निघताना त्याने स्वतःच्या बायकोला खांद्यावर घेतले होते आणि आई-वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना मागून खेचत तो पुढे निघाला. ते दृश्य बघून लोकं त्याला हसत. परंतु त्याची त्याला जराही लाजलज्जा वाटली नाही... त्याच्या खांद्यावर