श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 1

  • 10.5k
  • 6.7k

श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा उर्फ विठ्ठल अर्थात विठू माऊली थोर आद्य समाज सेवक आहे. भगवंत विठ्ठलाने भक्त किंवा वारकरी यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांची जात पाहिली नाही. त्यांचा धर्म पाहिला नाही. त्यांचे रंग रूप पाहीले नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली . त्यांना आपल्या चरणाशी त्याने घेतले. अनेकांना तर त्याने कित्येकदा मदत केली. त्यांना उराशी कवटाळून आधार दिला. वारकऱ्यांसोबत पंढरपूरला अनेक धारकरी सुद्धा विठ्ठल दर्शनाला येतात. शेतकरी येतात. लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वजण विठ्ठलाचा आशीर्