रेवतीने थर्मामीटर तीनदा पाहिलं. समोर तिचा पाच वर्षांचा मुलगा सुयश तापाने फणफणत होता. ताप उतरायचं काही नाव घेत घेईना.औषध देऊन सहा तास झाले पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर रेवतीची काळजी वाढू लागली....संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतीसमोर निपचित पडला होता. अचानक आलेल्या तापाचं कारण काही समजेना. त्यात सुनील... रेवतीचा नवरा कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता. तो आता सकाळीच परतणार. सुनीलला फोन करावा तर तो काळजी करत बसेल. त्यातही सकाळशिवाय तो परत येऊच शकत नव्हता. त्यात हे गाव अन् घर दोन्हीही नवीन असल्याने काय करावं रेवतीला सुचेना.घड्याळाने बाराचे टोले दिले तसे रेवती दचकली. बापरे! बारा वाजले अजूनही सुयशचा ताप