प्रायश्चित्त - 17

  • 7.6k
  • 3.3k

शाल्मली बाहेर पडली आणि तिने शंतनूचा नंबर फिरवला. शाल्मली ने दोन तीन वेळा शंतनूचा नंबर फिरवला पण बिझीटोन आला. मग ठेवला फोन पर्समधे तर लगेच वाजायला लागला. शंतनूचाच कॉल. “हॅलो, मी शंतनू ” “हो बोल. तुझाच नंबर ट्राय करत होते बिझी लागला.” “तुलाच लावत होतो” “ओह, बोल ना.” “ते पेपर्स मिळाले?” “हो. आजच.” “वाचलेस?” “नाही.” “का?” “गडबड होते जरा. आता घरी जाऊन डिव्होर्स पेपर्सवर सह्या करून लगेच कुरियर करते.” “हं!” “तू का फोन करत होतीस?” शाल्मली ला पटकन शब्द सुचेनात. दोन क्षण शांततेत गेले. “बोल ना” “शंतनू, मी तुला एवढंच सांगायला फोन केला की तू तुला हवं तेव्हा श्रीशला भेटू