प्रायश्चित्त - 15

  • 7.5k
  • 3.2k

हॉस्पिटल मधे पोहोचल्यावर ती तडक रूमवर निघाली, पण मग सगळ्यांसाठी काहीतरी ऑर्डर करावं म्हणून मग आधी खालच्या फ्लोअरवर गेली. ऑर्डर, आणि रुम नंबर सांगून लिफ्ट जवळ आली तर लिफ्ट साठी बरीच गर्दी होती. मग जिन्याने निघाली. दोन जिने चढून ओटी च्या फ्लोअरवर आली. तेव्हा केतकी तिथेच घुटमळताना दिसली. “का गं, घरी नाही गेलीस?” “नाही, आज आत्या नाही ना आली, मग डॅड मला सोडून कसा येणार?” “ओह, मग आता?” तिने नुसतेच खांदे वर केले. “कुठय बाबा तुझा?” “कांचन त्याला जराही सोडत नाहीय. हात धरून बस म्हणतेय.” “नंबर पाठ आहे डॅडचा?” “हो....” “सांग” तिने लगेच फोन लावला त्याला “मी केतकीला माझ्या रुममधे