प्रायश्चित्त - 13

  • 8.5k
  • 1
  • 3.4k

यासगळ्यात आपण शंतनूला बोलावलय भेटायला हे विसरूनच गेली ती. मग फोन वाजला तिचा दुपारी. “मी खाली आलोय. वर सोडत नाहीत मला” म्हणाला. ती म्हणाली “थांब तिथेच.” मग तिने रिसेप्शनिस्टला फोन केला आणि म्हणाली “आत्ता विजिटींग अवर्स आहेत ना? मग त्या माणसाला विजिटींग पास द्या.” रिसेपशनिस्ट म्हणाली “नक्की ना मॅम? सेक्युरिटीला पाठवू का बरोबर?” “नको, त्याची गरज नाही, पण हा एकदाच, परत नाही द्यायचा कधीच.” “ओके मॅम” शंतनू वर आला. दारावर टकटक झाली. तिने दार उघडलं. शंतनू आत आला. बराच वेळ श्रीशकडे पाहत राहिला . शाल्मलीच मग म्हणाली “ तू का आता परत परत येतो आहेस आमच्या आयुष्यात?” शंतनू पाहत राहिला