प्रायश्चित्त - 12

  • 7.4k
  • 3.4k

“श्रीशला ऐकू येईल ना आंटी आता.” तिने हसून मान हलवली. केतकी सतत तिच्या अधिक जवळ सरकून बसतेय असं तिच्या लक्षात आलं. तिनेही मग केतकीच्या खांदायांवर हात टाकत तिला आपल्या जवळ घेतली. दोघीही अशा बसून राहिल्या. थोड्या वेळाने नर्सने तिला आत बोलावले. सॅम मास्क तोंडावरून गळ्यात अडकवत बाहेर आला. “ऑपरेशन व्यवस्थित झालं. काळजीचं काहीच कारण नाही. शाम श्रीशची भूल उतरली तरी झोपेल बराच वेळ तो. तशी औषधं दिलेली असतात. रिकव्हरी मधेच राहिल संध्याकाळपर्यंत. थोड्या वेळाने नर्स सांगेल तुला मग बघून ये. ओके? “त्याने तिच्याकडे नजर रोखत विचारलं. “हो!” तिला त्या नजरेचा अर्थ बरोबर कळला. जणू तो म्हणत होता “शाम, तू रडतेस?