ती ही मग रूमकडे जायला निघाली. सॅम आला तर आपण तिथे असावं. रुमवर आल्यावर श्रीशसाठी खाऊ आलाच होता. श्रीशने आवडीने खाल्ला तो. तेवढ्यात सॅम आला. आल्या आल्या त्याने हात सॅनिटाईज केले. श्रीशच्या कानामागचा भाग चेक केला. “हं, गुड.” “हं बोला मॅडम, काय प्रॉब्लेम?” “सॅम आपण बोललो तेव्हा श्रीश च्या एकाच कानाचं ऑपरेशन ठरलं होतं, त्याप्रमाणे खर्चही काढला आपण, मग फॉर्मवर दोन्ही कानांचं कसं लिहीलय?” “शाम, अगं आपलं एका कानाचं वगैरे कधीच काही बोलणं झालं नाही. हे बघ, दोन प्रकारे यावर उपाय करतात. एक म्हणजे एका कानात कोक्लियर इंम्प्लांट बसवतात आणि दोन्ही कानात हियरिंग एडस् बसवतात. म्हणजे आवाज ॲम्प्लीफाय पण करतात