प्रायश्चित्त - 10

  • 7.1k
  • 3.3k

शाल्मली ने एक भला मोठा निश्वास सोडला. तेवढ्यात रिसेप्शनिस्टने तिला बोलावले. आता मात्र शाल्मलीने त्याला कडेवर घट्ट पकडून ठेवले. रुम अलॉट झालीच होती. “तुम्ही रुम मधे बसा. टेस्टस साठी बॉय घ्यायला येईल तेव्हा जा त्याच्याबरोबर. पैसे डिसचार्ज च्या वेळी घ्यायला सांगितलेत डॉक्टरनी.” शाल्मली काही न बोलता वॉर्ड बॉय बरोबर गेली रुममधे. इथे मात्र सर्व शांत होतं. पंचतारांकित हॉटेलची रुम वाटत होती ती हॉस्पिटल रुम पेक्षा. भिंतींवर मस्त निळ्या लाटा, त्यात रंगीत मासे असं सुंदर चित्र रंगवलं होतं. खिडक्यांचे पडदेही कार्टूनच्या चित्रांचे फार भडक नव्हेत पण प्रसन्न रंगांचे. दोन नवी कोरी टॉईज कॉटवर मांडलेली. बेडशीट वरही भावल्यांची चित्र. उशीला आकार टेडीचा. श्रीश