घरी आल्यावर शाल्मलीने श्रीशला वरण भात भरवला. स्वत:ही चार घास पोटात ढकलले. श्रीशला लगेच झोप लागली. ‘दमलं बाळ माझं’ असं म्हणत तिने डोक्यावरून हात फिरवत ओठ कपाळावर टेकले. श्रीशने झोपेत हात गळ्यात टाकला तिच्या. दोघांचाच असा कोश तयार झाला. शाल्मलीला तो नाजूक हात दूर करवेना. तशीच पडून राहिली ती किती वेळ आपल्या सुकुमार बाळाजवळ. पण असं झोपून जाऊन चालणार नव्हतं. मग नाईलाजाने उठली. तो फॉर्म काढला. बऱीच माहिती विचारली होती. त्यात आधी कुटुंबात कोणाला काही अशी समस्या होती का हा प्रश्न निरनिराळ्या संदर्भात परत परत विचारलेला दिसत होता. क्षणभर शाल्मली थांबली. मग तिने फोन उचलला. साडेनऊ वाजत होते. शंतनूचा नंबर