प्रायश्चित्त - 7

  • 6.8k
  • 3.4k

स्नेहल ने बेल वाजवली. शंतनू नुकताच आंघोळ करून बाथरूम मधून रोब घालून बाहेर येत होता. कामवाल्या मावशी असणार असं वाटून त्याने दार उघडले तर दारात स्नेहल. तो जरा गोंधळलाच. बस आलोच असं म्हणत आत गेला. हवेत त्याच्या आफ्टर शेव्हचा, शॉवर जेलचा मंद सुगंध दरवळत राहिला . कपडे घालून तो बाहेर आला. तुम्ही एकटेच धड जेवण नाही करणार म्हणून कंपनी द्यायला आले. शंतनू काहीच बोलला नाही. मग तीच उगाच विषय काढून बोलत राहिली. तेवढ्यात बाई आली. तिला शंतनूने फक्त साफसफाई करून जायला सांगितलं. ती गेल्यावर स्नेहल ने चट्कन जवळच्या हॉटेलमधून जेवण मागवलं. शंतनू म्हणाला “बाहेरच गेलो असतो.” “सर किती ऊन आहे बाहेर. मी