प्रायश्चित्त - 6

  • 7.8k
  • 3.6k

शाल्मली साईन लॅंग्वेज क्लासमधून बाहेर पडली. तेवढा वेळ श्रीश आईकडे राहायचा. त्याला खूप आवडायचं तिथे राहायला. मामा, मामी, मोठी भावंडं, आजी आजोबा, सगळे भरपूर लाड करत. या सर्वांचा शाल्मली ला खूप आधार वाटायचा. पुढच्या रविवारी सगळ्यांना जेवायला बोलवायचं तिने ठरवून टाकलं. तेवढीच वहिनीला एक दिवस स्वैपाकातून सुट्टी! आता तिला श्रीश च्या ट्रीटमेंटचं पहायचं होतं. काही पैसे तिने बाजूला काढून ठेवले होतेच. आज रात्री ऑनलाइन सर्च ती करणारच होती. शिवाय मेडिकल फिल्ड मधल्या काही मित्र मैत्रिणींचा सल्लाही घेणार होती. घरी येऊन तिने श्रीशचे मंमं,तिचे जेवण उरकले. श्रीश टेडीला घेऊन बेडवर चढला. मग तिने जरासे थोपटताच झोपीही गेला. शाल्मलीने लॅपटॉप उघडला.