प्रायश्चित्त - 5

  • 7.6k
  • 3.3k

शंतनू जसजसा तिच्या घराजवळ जाऊ लागला त्याचं अवसान गळू लागलं. “परत त्या तिरस्काराने भरलेल्या नजरेचा सामना करण्याची ताकद नाही तुझ्यात “मन बजाऊ लागलं. तो रस्त्याच्या कडेला थांबला. “काय करावं?” घालमेल होत होती जीवाची! मग तो गाडी कडेला लावून उतरला. मोकळा श्वास घेतल्यावर बरं वाटलं त्याला. समोरच मोठं खेळण्याचं दुकान दिसलं. तो आत गेला. समोरच एक मोठा टेडी होता. तो घेतला. कार्डवर लिहीलं “तुझ्या वेड्या बाबाकडून” मग शाल्मलीच्या माहेरचा पत्ता दिला. पोहचवायला सांगून तो परतीच्या वाटेला लागला. डोळे वहात होते. धूसर वाट होती पण निदान मार्ग मिळाला होता. प्रशांतने शाल्मली आणि श्रीश ला घराजवळ आणून सोडले. तिने वर बोलावले नाही. तो गाडी