म्हातारपण - 1 - निपुत्र

  • 14.9k
  • 4.8k

रस्त्यावर भरभर गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. नेहमीच असे व्हायचे.. बाजारात जाण्यासाठी प्रत्येकाला घाई .. आणि सोबत वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्रस्त करत. त्यामुळं मुलांना शिकवन्यात अडचण निर्माण होत असे. वर्गात तात्या मुलांना शिकवत होते. तात्या इतिहासाचे पदवीधर इतिहास हा विषय जितका त्यांच्या आवडीचा होता. तितकेच तेही मुलांना आत्मीयतेने शिकवत . तात्यांचा ज्या ज्या वर्गात पिरियड असायचा त्या वर्गातील मुलांची इतिहास या विषयातली गोडी वाढत होती. तात्यांना शिकवत असतांना मनोरंजन खूप असायचे हास्य कालोंळ हीं कमी नसायचं.. आज मात्र तात्यांना थोडं अस्वस्थता जाणवत होती. तरीही शिकवत होते. मुलांचं नुकसान होईल . शेवटचा पिरियड आहे अजून दहा पंधरा मिनिट शिकव्वायचं मग