जानू - 1

(13)
  • 20.6k
  • 4
  • 11.1k

हि कथा आहे .. अभय ची ..आणि त्याच्या ..वेड्या प्रेमाची...अभय ...तसा दिसायला .. फिल्मी हिरो सारखा ..अजिबात नव्हता. साधा सरळ..काळा सावळा.. उंच,केस मात्र इतरानि हेवा करावेत इतके सुंदर. दिसायला जरी हिरो नसला तरी...मनाचा राजा होता..सुख असो वा दुःख अभय नेहमी इतरांच्या मदतीला धावायचा... शेजारी पाजारी कोणाचं काही हि काम असो .. सर्वांच्या तोंडी एकच नाव...आपला अभय...आई वडीलांचा लाडका .. एकुलता एक मुलगा..पण लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले संस्कार म्हणजे ...हे विश्वची माझे घर.. त्यामुळे तो प्रत्येकाला आपलं मानायचा आणि आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करायचा..अभय अभ्यासात हुशार होता..एकदम शांत स्वभावाचा...आई वडीलांची काम तो कधीच टाळत नसे.. कधी कोणिशी भांडण नाही..