शांतीनगरची शाळा

(14)
  • 55.9k
  • 20.2k

शांतीनगर नावाचे राज्य होते. त्या नगराचा अरीहंत नावाचा राजा होता. राजा खुप हुशार, प्रजेची काळजी घेणारा होता. त्याने त्याचा राज्यात पक्के रस्ते, नदीवर सुंदर असा लांबेलांब घाट बांधला होता. मुलांना खेळण्यासाठी मैदाने, बगीचे निर्माण केले होते.राजा प्रजेची खुप काळजी घ्यायचा. लोकाचां तो समस्या सोडवत असे. त्यासाठी आठवडयातुन एक दिवस राखलेला होता. दुर दुरून राज्यातील लोक येत असत. राजा सर्व नोंदी ठेवत असे. तो त्या नियमीत वाचुन मार्ग काढत असे. राज्यातील लोक मेहनती होते. कष्टाळु होते. राजा राज्याचा विकासासाठी लोकांकडून सल्ले घ्यायचा. राजा दुरदर्शी आणि हुशार होता. त्याला समाजकारणाची आवड होती. तो नेहमी म्हणायचा, "उत्तम समाज हा कष्टाळू लोक आणि त्याना