वैर

  • 7.8k
  • 2.3k

वैर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरदने आपल्या विरोधात प्रचार केल्यामुळेच आपल्याला निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला हे बाबुराव कदमाच्या चांगलंच लक्षात आलं होतं. कारण शरद हा निर्व्यसनी माणूस, त्यात तो अडल्या-नडलेल्यांची मदत करायचा.समाजसेवा हा गुण त्याच्यामध्ये लहाणपणापासूनच होता. कोणताही हेतु न धरता तो प्रत्येकाला मदत करायचा. त्याच्या याच स्वभावाचा फायदा बाबुराव कदमाचा विरोधक आणि शरदचा लहाणपणापासूनचा मित्र अमर गुजर ला झाला होता.अमर गुजर अगदी थोडया मतांच्या फरकाने निवडून आला होता. आपल्या पराभवासाठी शरदच जबाबदार असून त्याच्यामुळेच आपला निसटता पराभव झाला असल्याची पक्की धारणा कदमाची झाली होती. त्यामुळे तो शरद विषयी मनात अढी धरून होता. शरद हा गावातील कपडयांचा नामांकीत