बटरफ्लाय वूमन - भाग १

  • 9.9k
  • 4.9k

वैजंता टीव्हीसमोर शेकोटी घेत बसली होती. तिच्या घरात खूपच थंडी लागत होती.टीव्हीतल्या ज्वाले वरती ती तिचे हात शेकवत होती ..पाहणाऱ्याला हे दृश्य खुपच विचित्र वाटले असते. परंतु तेवढी उब तिच्या हातांना पुरेशी होती.टीव्हीमधील शेकोटीच्या ज्वाला तिच्या हाताला चटके देत होत्या. तिच्या शरीराला सुद्धा टीव्ही मधल्या शेकोटीची ऊब लागत होती. तिच्या अंगातली थंडी निघून गेल्यावर ती तिथून उठली. ती टीव्हीपासून बाजूला होते न होते तोच अचानक टीव्ही मधल्या ज्वाला तिच्या अंगाला चटके देऊ लागल्या. ती हलकेच हसली.तिने टिव्ही बंद केला.तिने मनोमन जाणले होते टीव्ही मधली ज्वाला तिला भस्म करायला बघत होती. मात्र तो तिला भास वाटला. म्हणून शंका येऊन ती पुन्हा टीव्ही