गुप्तधन

  • 12.8k
  • 3.7k

गुप्तधन मरीबा ठरल्याप्रमाणे रात्री बारा वाजता उठला. आपण कोठे चाललो आहोत, याबाबत घरातील लोकांनाही थांगपत्ता लागु नये, यासाठी त्याने लेकरं आणी बायको झोपले आहेत का? याचा कानोसा घेतला. आपल्या छातीवर ठेवलेला बायकोचा हात त्याने अलगद बाजूला केला. ती काही हालचाल करते का? याचा त्याने पुन्हा एकदा कानोसा घेतला. तिची कसलीच हालचाल जाणवली नाही. दिवसभरात रानात काम केल्यामुळे तिला गाढ झोप लागली होती. मरीबाने आवाज होवु न देता हळूच दरवाजाची कडी काढली. व्हरांडयात ठेवलेला कंदील घेवून तो बाहेर पडला. सगळीकडे किर्र अंधार होता. गावातील डी.पी.जळून आठ दिवस झाले होते. तरी अजून दुरुस्त केलेली नव्हती. त्यामुळे सगळा गाव अंधाराने कवेत