दिवसामागून - दिवस जात होते...... ते म्हणतात ना, मुली ह्या मुलांपेक्षा लवकर मोठ्या होतात तसंच काहीसं.... आपली सुकन्या मोठी होत होती.... आणि तितकीच समजूतदार ही..... प्रत्येक लहानात - लहान गोष्टीत आनंद शोधून खुश राहायची, जास्त कोणात लवकर गुंतायची नाही (मला वाटतं, हा गुण आता खूप महत्त्वाचा आहे...) तिचा पक्षी आणि मुक प्राणी यांमध्ये खूप जीव होता.... पक्ष्यांचं उडण बघून, स्वतः ही असंच उडावं, कुठेतरी दूर जाऊन मोकळ्या हवेत फिरून यावं असं तिला नेहमीच वाटायचं..... मूकं प्राणी किती प्रामाणिक असतात त्यांना जीव लावला त्याचं उपकार ते कधीही विसरत नाहीत असे निर्मळ भाव तिच्या मनात प्राण्यांविषयी होते.... शारीरिक बदल टप्प्याटप्प्याने घडून येतात.....