प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५०.

  • 6.5k
  • 1
  • 2.4k

तर, माझ्या प्रिय वाचकांनो.... आपण आता कथेत थोडं हळू - हळू पुढे जाऊया.... मी थोडक्यात तुम्हाला तिचा बालपण ते या कथेचं शीर्षक साध्य होईल इथपर्यंत लवकर - लवकर घेऊन जाईल..... नंतर, योग्य वेळ आल्यावर कथा तुम्हाला उलगडेलच.... माझ्या कथांमध्ये नायक वा नायिका यांच्या विचारांवर मी त्यांच्या कुटुंबियांच्या चांगल्या संस्कारांचा परिणाम किंबहुना सकारात्मक परिणाम दाखवू पाहते....(जर, "खऱ्या आयुष्यात असं कुठ असतं का!?" हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, मग असं वागायला शिकणे ही काळाची गरज म्हणावी लागेल....) आता हे प्रत्येकालाच पटावं हा अट्टाहास ही मी बाळगत नाही.... हेच संस्कार दाखवायला मी पूर्ण कुटुंबीय कुठल्या प्रगल्भ विचारांचे आहेत हे मागील भागात दाखवण्याचा