मी सुंदर नाही - ६ - अंतिम भाग

  • 7.1k
  • 3.2k

सुहास स्वतःच्या दिसण्या बाबत उदासीन झाली होती. ती तिच्या सौंदर्या बद्दल फारच बेफिकीर झाली होती. तिच्या दातांमुळे तीचा सगळा उत्साह मावळून गेला होता. तिचे दात पिवळे पडू लागले होते. तिच्या दातावर रक्ताचे डाग सुद्धा दिसू लागले होते. सुहासला भीती निर्माण झाली की आपल्याला 'पायोरिया' नावाचा दातांचा आजार झाला तर नसावा. 'पायोरिया' नावाचा आजार हिरड्या आणि दात अगदी कमकुवत करतो आणि त्याच्यामध्ये पू निर्माण करतो. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.हिरड्या कमकुवत झाल्यामुळे दात सैल होऊन ते वेडेवाकडे दिसतात. तरीसुद्धा सुहास स्वतःचे दात दिवसातून तीन-चार वेळा घासत होती. तीच्या दातांनी तीचं हसं करून सोडले होते.तरीसुद्धा ती निराश झाली नव्हती. तिचे दात असे लाल-पिवळे