एक टॅक्सी-दोन प्रवासी - भाग 1

  • 12.4k
  • 4.8k

ठिकाण:कुठलसं शांत.वेळ:अर्ध्या रात्रीची.टॅक्सीतुन दोन जण उतरले.एकमेकांना अनोळखी.अगदी रात्रीच भेटलेले,पण एकाच गुंत्याने त्यांना एकत्र आणलेलं. रक्त गोठवुन टाकणारी थंडी होती.टॅक्सीतुन पाय खाली टाकवेना,पण माणुसकीच्या नात्याने,अर्ध्या रात्री देवमाणसासारखा भेटलेला टॅक्सी ड्राइवर इथवर सोडतो असं स्वतःहून म्हटल्यामुळे त्यांचं फावलेलं.अशातच त्याला अमक्या ठिकाणी सोड म्हणणं वावगं ठरणार होतं अन उजाडायला जेमतेम काहीच तास उरल्यामुळे त्यांच्यासाठी सोयीचही जाणार होतं.ते उतरले.टॅक्सी चालकाला धन्यवाद केला अन उपकृत नजरेनं जात्या टॅक्सीला नजरभरून पाहिले.मागच्या काचेवर लावलेला रेडियम चा एका महाराजांचा फोटो आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेला होता.रात्रीच्या चांदण्यातून तो चमकून गेला.दोघांनी एकमेकांना पाहिलं.दुरदूरवर आठवून पाहिलं पण त्यानी कधीच एकमेकांना पहिलं नव्हतं.पण आज मात्र खूप वर्षांची ओळख असल्यासारखं वाटलं त्यांना.संभाषणाची सुरुवात करावी