" युद्ध नको मज बुद्ध हवा "संघर्ष म्हणजे दुःख, क्लेश ,इजा हे समीकरण तर आहेच , पण एक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष आवश्यकही असतो . तो कौशल्यपूर्ण रितीने हाताळणे आणि त्याची योग्य पद्धतीने वासलात लावणे, ही एक कला आहे. व्यक्तीशः मी संघर्ष ,वाद , कलह यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करू इच्छित नाही . कारण ते निःसंशय क्लेश आणि निंदेस पात्र आहेत . पण संघर्षरुपी काळ्या ढगाची रुपेरी रेषा दाखवून तो सुसह्य करून , निराकरणाचे उपाय सुचवून संघर्ष शमन करण्याचा प्रयत्न करीत आहे. संघर्ष अशा बाबी प्रकाशात आणते, ज्यांची खरोखर उकल होणे गरजेचे आहे , ज्या पीडा दायक