कवी असह्य. - 1

  • 12.7k
  • 4.4k

कवी असह्य व माझा संबंध तसा जुनाच. ऋणानुबंध प्रकारात मोडतील असे आमचे संबंध मुळीच नाहीत. आज मात्र अचानकच कवी असह्यांच्या ओघवत्या वाणीतून आमच्या नात्यातील प्रेम, प्लास्टिकच्या पिशवीने गटार तुंबून वहाव तसं, वहात होतं. देवावरचा विश्वास उडून मी नास्तिक व्हायला कैक प्रसंगांचा हातभार असला तरी 'कवी असह्यांशी ओळख' हा त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग. दिवसाची सुरुवात—मी हिच्यापेक्षा अमळच लवकर उठल्याने—शांततेत झाली होती. कुठूनतरी दूधात माशी शिंकावी, दूधात विरजन पडावे किंवा दुध उकळताना दूध फुटावे असंच काहीसे कवी असह्य आल्याने झालेलं होतं. घड्याळाकडे मी पुन्हा एकदा निर्विकारपणे पाहिलं. जे घड्याळ माझ्याकडे दररोज सर्कशीतल्या रिंगमास्टर प्रमाणे पाहत असतं त्याच घड्याळाचा चेहरा आज