मी सुंदर नाही - ५

  • 7k
  • 3.4k

सुहासला काय करावे कळत नव्हते. मात्र ती गोंधळली नव्हती किंवा स्वतःशीच त्रागा करत नव्हती. तीची मनस्थिती काबूत होती आणि ती एकदम शांत होती. सुहास कुरूप नव्हती. ती फार उद्धट सुद्धा नव्हती. मात्र ती तशी दिसते. त्याचे खापर लोक तिच्या जन्माला देतात. ही गोष्ट मात्र तिला खूपच खटकत होती. तिच्या मनात विचार येत होते. लोकं कशी असतात ना... अनेकांना दृष्टी नसते, ते दृष्टीहीन असतात .अनेक लोकं मुकी असतात. ते बोलू शकत नाहीत. एखादा बुटका असतो. तर कुणी एखादी उंच असते. उंच मुलीला जिराफ म्हणून चिडवलं जातं. कुणी जाड असेल, कोणी किरकोळ असेल, तर एखाद्या जाड्याला जाडा. किरकोळ मुलीला कडकी असं म्हणतात.