मी सुंदर नाही - ३

  • 9.3k
  • 4.1k

तसं पहायला गेलं तर सुहास दिसायला गोरीपान होती. तिच्या चेहऱ्यावर काळे पणाचा जराही मागमूस नव्हता. तिचे दात वेडेवाकडे आणि बाहेर आलेले नसते.तर सुहास छान दिसली असती. सुहास तशी दिसत असल्यामुळे अनेकांनी तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. अगदी ताजा प्रसंग सांगायचा तर... आठ दिवसापूर्वी रस्त्याने जाताना. एका माणसाने तिला समोरून धडक दिली. तिच्या गालाला अस्पष्ट स्पर्श केला. मात्र सुहास सावध होती. त्यामुळे पुढचा प्रसंग टळला होता. ती तशी दिसत असल्यामुळे त्याने तो प्रसंग केला होता. ती त्याला एकदमच वेंधळी वाटत होती. आपण असे केले तर ती काही करणार नाही असेही त्याला वाटत असावे. अशा अनेक प्रसंगाला सुहास सामोरी गेली होती. मात्र