स्वप्नद्वार ( भयकथा ) भाग 1 त्या गर्द काळोख्या भयाण रात्री निशांत एकटाच जिवाच्या आकांतान धावत होता. मागे असलेली अमानवी शक्ती आज त्याचा प्राण घेऊनच शांत होईल हे त्याला कळून चुकल होत. त्या काळ रात्री फक्त रातकिडेच किर.. किर.. करीत होते. तिरकस नजरेने त्याने मागे वळून पहिले तो वाऱ्याच्या वेगाने त्याच्याकडेच येत होता. तसा निशांतनेही आपल्या धावण्याचा वेग वाढविला. तो कोण आहे? त्याचा आणि आपला संबंध काय? आपण धावतोय तरी कुठे.. गाव, शहर कि जंगल?? असे बरेचसे प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते पण सध्या तरी ते महत्वाचे नव्हते. सध्या तरी