सावर रे.... - 5

  • 8.8k
  • 3.8k

पलीकडून येणारा आवाज ऐकून जाई स्तब्ध झाली. तिला विश्वसच बसत नव्हता. यश ने तिला कॉल केला होता. ती पुन्हा त्याच आवाजात हरवून गेली. *हॅलो, जाई…..? पलीकडून यश बोलत होता पण जाईच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. ती नुसतीच ऐकत होती. पुढे काही बोलावं हे तिला सुचतच नव्हतं. प्रेमाच असच असतं ना समोर आवाज जरी ऐकला तरी मन गुंतून जात. सगळ्या जगाचा विसर पडतो. सुख-दुःख संवेदना विसरून मन तल्लीन होऊन जाते. जाईच पण तसच झालं होतं. तो मात्र तसाच बोलत राहिला. हॅलो….हॅलो…..आवाज येतोय ना? जाई…. हॅलो… तू बोलत का नाहीस?....जाई आर यु देअर?.......