ती__आणि__तो... - 36

(51)
  • 19.1k
  • 1
  • 9.4k

भाग__३६ हॉस्पिटलमध्ये खुप शांतता होती........आतमध्ये रम्याची डिलीवरी चालू होती........बाहेर राहुल,रणजीत,आणि माधवी बसल्या होत्या...आतमध्ये रम्या ओरडत होती........सगळे बाहेर काळजीत होते.......तेवढ्यात आतून बाळाच्या रड़न्याचा आवाज आला........तस सगळ्यांच लक्ष तिकडे गेल........मग राधा बाहेर आली........ राधा: ये...राहुल दादा अभिनंदन...मुलगा झाला तुम्हाला...? राहुल: खरच,बाप्पा पावला...आणि रम्या कशी आहे?बाळ??? राधा: बाळ आणि ताई दोघे सुखरूप आहेत....नॉर्मल झाल सगळ... माधवी: वा..राधा सगळ सुखरूप पार पाडलेस बघ... राधा: क़ाय काकू तुम्ही..सगळ कान्हाच करून घेतो माझ्याकडून....(हात जोड़त) माधव: मी जाउन बघू का ग...दोघाना.. राधा: हो..जा ना... राहुल: मी घरी कळवतो...आलोच हु.......(फोन लावत) रणजीत: राधुडे..तू ना खुप भारी डॉक्टर आहेस...सगळ निट पार पाडतेस... राधा: कौतुक पूरे...