संकटावर खंबीरपणे मात केल्याने ,आजचे संकट उद्याच्या संधीमध्ये आपण प्रवर्तित करु शकतो ,ही सकारात्मकता आणि शुभता या लेखातून प्रक्षेपित (project) करण्याचा माझा उद्देश आहे . पलायन ,आत्मघात, समाजघात , एखाद्या समूहाप्रति दूषित दृष्टिकोन ठेवणे ,उन्माद, वैफल्य या अशुभाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी वाचकांस स्वयं प्रेरणा ,आत्म शक्ती मिळावी याचसाठी, हा लेखन प्रपंच, मी केवळ वाचकांच्या समंजसपणावर भिस्त(विश्वास) ठेवून मांडला आहे . अव्याहत सुरू असलेल्या सृष्टी चक्रातील एक नेहमीची रात्र. रडणारी लेकरे ,चिवचिवणारी पाखरे आणि समईच्या वाती सारेच दमून विझून गेले होते .एका मोठया राज्यातील शेवटच्या ध्रुवावरचे छोटेसे गाव . त्या गावावर अचानक एका काळरात्री संकट ओढवले . भयानक