दुबई ट्रिप

  • 6.7k
  • 2
  • 2.3k

आम्ही युगांडाला असताना भारतात सुट्टीसाठी जाताना ४ दिवस दुबई बघून नंतर भारतात जायचे हे ठरवले. तिथल्याच एका एजन्टकडे बुकिंग केले तेव्हा त्याने विचारले की अजून एका कपलला दुबई बघायचे आहे आणि त्यांना कोणाबरोबर तरी जायचे आहे तर तुम्हाला चालेल का? आम्ही लगेच होकार दिला. आम्ही चौघे, माझी आई व ते कपल असे आम्ही दुबई ट्रिपसाठी निघालो. विमानप्रवास छान झाला. एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला भारतीय चालक असलेली गाडी आली होती. त्याने आमचे छान स्वागत करून आता पुढचे ४ दिवस मी तुम्हाला सगळीकडे फिरवणार आहे म्हणून सांगितले. हॉटेल मध्ये गेल्यावर बॅग्स ठेवून थोडे फ्रेश होऊन आम्ही लगेच बाहेर पडलॊ. मी माझ्या लेखामध्ये प्रवासवर्णन