असे म्हटले जाते की समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितले होते . महाराज मी तुमच्या स्वराज्या मध्ये आलेलो आहे. आपण माझी उत्तम व्यवस्था करण्यास आपल्या माणसांना सांगावे. मात्र ही एकदम वेगळी गोष्ट आहे. शिवाजी महाराज हे उत्तम प्रशिक्षक आणि शिक्षक होते .याचा मोठा दाखला म्हणजे हिरकणीचा प्रसंग. हिरकणी नावाची गवळण गडावर दूध विकायला आली होती .दूध विकताना तिला वेळेचे भान राहिले नाही . संध्याकाळच्या समयी गडाचे दरवाजे बंद झाले. तिला सत्वर घरी जायचे होते. तिने गडाचा दरवाजा बंद करणाऱ्याला विचारून पाहिले . दादा गडाखाली मला सोडा . गडाच्या खाली मला जायचे आहे. माझ्या घरी माझे लहान बाळ आहे.