पहिले पाढे पंचावन्न.

  • 8.4k
  • 2.5k

प्रेम ही चमत्कारी भावना फक्त मेंदूतील एक रसायन आहे हे शास्त्रीय सत्य मानायला मन धजावत नाही. कारण, प्रेमाचा आवाका मेंदूपूरताच सीमित राहत नाही. कवटीच्या सीमा भेदून सगळ्या रोमरोमात प्रेमाचा संचार होत असतो. प्रेम ही मानवाला पुरून उरणारी भावना आहे. माणूस संपतो; पण प्रेम संपत नाही! कोणीही प्रेम म्हणलं की पहिल्यांदा जोडीदाराचे प्रेम असाच अर्थ घेतला जातो हा या शब्दाला असणारा शाप आहे. प्रेम कोणावरही जडू शकतं, नाही का? आई-वडिलांवरच प्रेम, गुरूप्रेम, पाल्यावरचं प्रेम, मैत्रीप्रेम, देशप्रेम, राष्ट्रप्रेम, निसर्गप्रेम, ईश्वरावरच प्रेम. प्रेम करण्यासाठी कोणीही चालतं असं असलं तरी आपल्या लक्षात ठळकपणे राहतं ते जोडीदारावरच प्रेम. आयुष्यातील जोडीदारावर असणारं प्रेम