तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व

  • 10k
  • 3k

संध्याकाळची वेळ ऑफिसमधून दमलेला मध्यम वर्गीय पती घरी येतो. एवढ्यात उपनगर ते शहर असा प्रवास करून थकलेली आणि ऑफिसच्या कामाने वाकलेली त्यांची पत्नी सुध्दा घरी येते . काही वेळाने भाऊ पण घरी येतो. भावाची गृहिणी असणारी पत्नी सुद्धा घरकामाने त्रस्त आहे . घरट्यात पाखरे परतली म्हणून , आजी आजोबा देखील भरल्या घरात लहानग्या नातवंडांना ठेवून बाहेर पाय मोकळे करण्यासाठी निघतात. अभ्यास की खेळ या संभ्रमात असणारी दोन छोटी पिल्ले आई बाबांकडे धाव घेतात .सारे उद्विग्न आहेत म्हणून पिल्ले चिवचिव करून शांत होतात. 13/14 वर्षांची नात आधीच बाहेर गेलेली आहे . तिची विचारपूस करून बाबा आणखी चिडतात .नोकरी करणारी पत्नी