अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 43

(14)
  • 10k
  • 4.5k

रात्री जेवणाची वेळ झाली असते.. शौर्य आणि विराजची डायनींग टेबलवर नेहमीप्रमाणे मस्ती चालु असते.. शौर्यला लांबुनच अनिता येताना दिसते.. तसा त्याचा आत्तापर्यंत हसणारा चेहरा गंभीर झाला.. विराज : "ए शौर्य आता रडु नकोस.. तुझी मस्ती केली तर तु लगेच तोंड पाडुन बसतोस.." नेहमी विराज सोबत आरग्युमेन्ट करणारा शौर्य आता मात्र शांतच बसतो.. विराज : "काय झालं??" अनिता : "तुम्ही लोक जेवुन घ्यायच ना.. कोणाची वाट बघत थांबलात..??" पाठुन अनिताचा आवाज ऐकताच विराज मागे बघतो.. विराज : "मम्मा तु आलीस??... आम्ही दोघे तुझीच वाट बघत होतो..." अनिता : "का?? काय झालं??" विराज : "खुप दिवसांनी आपण तिघ एकत्र आहोत.. म्हणुन विचार