ईश्वरीशक्ती

  • 7.3k
  • 2k

मल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम ।।अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि कर्म यांचे सतत चिंतन कारावे.(श्रीमदभागवत) परमेश्वराची पूजा करावी,भक्ती करावी पण हे सर्व करीत असतांना अभिमान धरू नये स्वतः केलेल्या कामाचा गवगवा करू नये. संसार सागरातून पार होण्यासाठी सत्संग व भक्ती महत्वाची आहे.परमात्मा एकच आहे पण अनेक असल्या सारखे वाटते.जमिनीत बी पेरल्यानंतर जसे अनेकरुपात विस्तार पाऊन प्रकट होते किंव्हाकपड्यामध्ये जसे धागेच ओतप्रोत भरलेले आहे. बुद्धीच्या साहयाने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषया पासून