काही दिवस असेच जातात..... सचिन & जॉली विथ फॅमिली त्यांचं गेट - टू - गेदर नेहमीच होत असतं...... कधी - कधी ते दोघेच फिरायला सुद्धा जातात...... त्यांचं प्रेम दिवसेंदिवस खुलत असतं.....❣️❣️ काही महिन्यांनी, आज नंदिनी समुपदेशन केंद्रातून घरी येणार असते..... तिच्या स्वागताची तयारी म्हणून, सगळे जमले असतात...... घरी परतल्यावर तिची रिस्पॉन्सिबिलिटी आजी आणि जयावर असते..... नंदिनीला घेऊन, सचिन आणि सल्लू गाडीतून उतरतात आणि येऊन दारावर उभे होतात.... त्यांचं ओक्षण केलं जातं..... नंतर सगळे आत येतात.... सगळ्यांचा प्रेमळ स्वभाव बघून नंदिनिला भरून येतं..... तिचं रडू कोसळतं..... आजी जाऊन तिला जवळ घेते..... आजी : "बाळा आता रडायचं नाही..... इथून पुढे मी तुला