मनातल्या मनातच विचार करता करता प्रत्येक विचारागणिक गार्गीचा श्वास वाढत होता, तिच्या बंद डोळ्यांतून अश्रू बाहेर पडत होते... नर्स नि ते बघितलं आणि लगेच तिच्या आईला हाक मारली.. तसच आईनेही स्वतःला सावरत आणि चेहऱ्यावर खोटं हसू ठेवत तिच्याजवळ गेली.. ती झोपलेली दिसत होती व डोळ्यात पाणी सुद्धा होतं.. म्हणून आईने तिच्या डोक्यावरून हलकाच हात फिरवून तिला उठवलं..तिनेही लगेच डोळे किल किल करत उघडले.. आणि आईला पुढे बघून तिला हायसं वाटलं.. तिने लगेच आईचा हात हातात घेत आईला म्हंटल गार्गी - आई मला एक वचन देशील.. आई - कोणतं वचन?? गार्गी - मला आणि गौरवला जर काही झालं तर माझ्या मुलीला