चिल्लर आज शाळेचा पहिलाच दिवस होता. बाळुला नविन गणवेश नव्हता, म्हणून त्याने गेल्या वर्षाचाच गणवेश घातला. तो गणवेश त्याला आखुड येत होता. पँटचं हुकही तुटलं होतं. त्यानं कडदुडयात डबडयाची काडी अडकवून पँट कमरेला फिट केली. पँट जागोजागी फाटली होती,सिटवर फाटलेल्या ठिकाणी बाळुच्या आईने वेगळया रंगाच्या कपडयाचं ठिगळ बसवलं होतं. शर्टच्या भाया त्याच्या हाताच्या मनगटाच्या वर येत होत्या, खालूनही शर्ट आखूड येत होता. छडी वाचवण्यासाठी बाळु तोच जुना गणवेश घालून शाळेत गेला. सगळया पोरांनी शर्टइन केलेली त्याने पाहिली. त्याला आठवलं, जाधव मास्तर शर्टइन केली नाहीतर त्याची वेगळीच छडी मारतात. त्याने शर्टइन केली, ठिगळावर हात ठेवून तो प्रार्थनेला गेला. प्रार्थना झाल्यावर