नीरा.

  • 8.1k
  • 2.7k

जानेवारी म्हणजे सुरुवात, सुरुवात म्हणजे जानेवारी. मोसमी वारे, मतलई वारे अशा प्रकारचे कोणतेच वारे जानेवारीत अनुभवायला मिळत नाहीत. जानेवारीत असतात उत्साहाचे वारे! जोष-जल्लोषाचे वारे! नववर्षात नव्याकोऱ्या—किंवा उरल्यासुरल्या—आयुष्याला सर्वांनीच पुन्हा सुरुवात केलेली असते. संकल्पाने मन-मेंदू व्यापलेले असतात, संकल्पांची पूर्ती होण्याची शक्यताही जास्तच असते. हळूहळू भावनांचा गदारोळ मावळला की संकल्प कोलमडून पुन्हा तेच 'गेल्यावर्षीचे अकरा महिने' सुरू होतात. जानेवारीची वैशिष्ट्ये अगण्य आहेत. जानेवारीत तोटे कमीच; परंतू त्यातला एक तोटा दुधात विरजण घालण्यासाठी पुरेसा आहे. तो तोटा म्हणजे 'उन्हाळा.' नारायणाने चटक्यांचे फटके मारायला या महिन्यात विशेष प्रगती केलेली असते. दुपार झाली की मुळचे असणारे उत्साहाचे वारे-निरुत्साहाचे वारे बनतात. दिसेल त्या सावलीत