शौर्य एक टक त्याच्या मम्माकडे बघतच राहिला. समीरा रागातच शौर्य जवळ येते. सोबत त्याचे मित्र मंडळी सुद्धा.. समीराच त्याच्यापाठी असलेल्या त्याच्या आई आणि भावाकडे लक्षच नसत.. ती रागातच त्याच्या हाताला धरतच त्याच तोंड आपल्याकडे फिरवते.. समीरा : "शौर्य प्लिज स्टॉप दिस... सोड त्याला जाऊदे.. आणि चल तु इथुन.." राज : "ए समीरा तु उगाच घाबरतेस.. कसला भारी फायटिंग करतो तो.. मी तर फॅन झालोय ह्याचा.." टॉनी : "मग गोल गोल फिरून हवा घाल ह्याला.. घाम बघ किती आलाय ह्याला.." टॉनी वृषभला हसतच टाळी देत बोलला.. वृषभ : "तु असा शांत का आहेस??" "ते मss मम्माss", शौर्य रडवा चेहराकरतच बोलतो.. वृषभ