रात्रीचे अकरा वाजून गेले होते. चांदण्या रात्रीत मी बाहेर अंगणात खुर्ची टाकून अंगावर ब्लॅंकेट घेऊन बसलो होतो. खूप वर्षांपूर्वीच्या आठवणींना ताजे करत होतो. डायरीचे प्रत्येक पान वाचताना मन भरुन येत होते. आठवणी मला अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची जाणीव करून देत होत्या. मी डायरी मिटली आणि खुर्चीला पाठीमागे रेलून आकाशातील ताऱ्यांकडे पाहू लागलो. असंख्य तारे होते... काही दिसत होते आणि काही दिसत नव्हते. कदाचित त्या ताऱ्यांमध्येच माझी तन्वी कुठेतरी असेल.. आणि तिथून ती मला पाहत असेल. कदाचित तिला तिथे खूप सारे मित्र-मैत्रिणीही भेटले असतील... पण तिला माझ्या व तिच्या आठवणी लक्षात असतील ना? वार्याची एक थंडगार झुळुक अंगाला स्पर्शून गेली. माझ्या अंगावर