अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 35

(15)
  • 9k
  • 1
  • 4.2k

शौर्यला रोहन समोर काय बोलाव तेच कळत नसत.. रोहन : तु आता अस का बोललास मनवी तुला ब्लॅकमेल करते..?? शौर्य खाली मान घालुन कसल्या तरी विचारात हरवुन जातो.. "अरे बोल ना काहीतरी..",रोहन जोरातच ओरडतो शौर्य ₹वर वृषभ : "रोहन हळु.... एवढ्या मोठ्याने का ओरडतोयस तु?? सगळे बघतायत इथे.." रोहन : "मग काय करू यार?? आज सकाळपासून मी वेड्या सारखा ह्याच्या मागे मागे फिरतोय पण हा साध बघत सुद्धा नाही माझ्याकडे.. तुम्हाला माहितीना तो नाही नीट बोलला तर मला त्रास होतो आणि त्यालाही माहिती तरी तो अस करतोय.." शौर्य : "मग काल तु जे वागलास त्यामुळे मला किती त्रास झाला असेल